Mahindra Electric Thar : महिंद्रा लाँच करणार नवीन इलेक्ट्रिक थार ! काय असेल किंमत? जाणून घ्या इथे!

Mahindra Electric Thar : महिंद्रा कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी काही तरी नवीन आनण्याचा प्रयत्न करत असते आणि नेहमी च आपल्या ह्या प्रयत्नात ते सफल पण होतात असेच ह्या वेळेस महिंद्रा कंपनी ने स्वातंत्र दिनाचं औचित्य साधून त्यांची सर्वात पसंत केली जाणारी SUV गाडी थार ह्याची इलेक्ट्रिक मॉडेल Mahindra Electric Thar बाजारात आणणार आहे. नुकताच १५ ऑगस्ट २०२३ रोजी साऊथ आफ्रिका च्या केप टाउन मध्ये ह्या महिंद्रा च्या थार SUV इलेक्ट्रिक मॉडेल चे अवलोकन करण्यात आले. आणि इलेक्ट्रिक थार कशी असेल ह्याचे मॉडेल दाखवण्यात आले आहे.

mahindra-Electric-Tha
mahindra-Electric-Thar

Mahindra Electric Thar : महिंद्रा कंपनी ची थार ही SUV जेव्हा पासून लाँच झाली आहे तेव्हा पासून ह्या SUV ने तरुणाई च्या मनावर गारुड घातले आहे आणि ही गाडी आपल्या कडे असावी अशी प्रत्येक तरुणाची इच्छा दिसून येते. त्यामुळे लाँच झाल्या पासून आता पर्यंत ह्या गाडी ची क्रेझ कमी होताना दिसत नाहीये.

काय आहेत नवीन Mahindra Electric Thar चे फीचर्स?

mahindra-electric-thar-features
mahindra-electric-thar-features

Mahindra Electric Thar Features : महिंद्रा नेहमीच आपल्या कार्स मध्ये नव नवीन गोष्टी घेऊन येत असते आणि ह्या इलेक्ट्रिक SUV मध्ये आपल्याला अश्याच गोष्टी बघायला मिळणार आहेत. ह्या मध्ये आपल्याला Baja type सस्पेन्शन बघायला मिळणार आहे आणि ह्या SUV चा ग्राउंड क्लीअरन्स पण खूप जास्त असणार आहे त्यामुळे ऑफ रोड ड्रायविंग साठी पण हि गाडी रेगुलर थार सारखीच दमदार असणार आहे.

Mahindra Electric Thar चा हेड लाईट चा लुक एकदम चौरस सारखा असणार आहे आणि समोर आयताकृती ग्रील आहे आणि बम्पर असणार आहे ज्यामध्ये लँड रोव्हर आणि लँड कृजर सारख्या लुक चा वापर केल्या सारखा दिसतो . इलेक्ट्रिक थार ७५kwh च्या बॅटरी सपोर्ट सोबत येणार आहे, ज्याची रेंज जवळपास ४०० किलोमीटर असणार आहे. हि कार ड्युअल इलेक्ट्रिक मोटर सेटप सोबत येणार आहे त्यामुळे हि कार ४ बाय ४ व्हील ड्राईव्ह असणार आहे.

कधी येणार Mahindra Electric Thar बाजारात ?

electric-thar
electric-thar

Mahindra Electric Thar महिंद्रा ची ही इलेक्ट्रिक थार चा लाँच इव्हेंट १५ ऑगस्ट २०२३ मध्ये साऊथ आफ्रिका मध्ये करण्यात आला होता त्या मध्ये हि electric thar कशी दिसेल ह्याचा एक मॉडेल दाखवण्यात आला होता सोबतच हि कंपनी ने ह्या कार कधी पर्यंत बाजारात उपलब्ध होईल हे सुद्धा ह्याची इव्हेंट मध्ये सांगितले होते. कंपनी नुसार १५ ऑगस्ट २०२६ ला हि इलेक्ट्रिक थार भारतीय बाजारात उपलब्ध होईल .

काय असेल ह्या Mahindra Electric Thar ची किंमत ?

electric-thar-price
electric-thar-price

Mahindra Electric Thar : महिंद्रा हि SUV ग्लोबल मार्केट ला ध्यानात ठेऊन बनवली आहे, आणि महिंद्रा च्या ह्या electric thar कडे बघून ह्याचीच आपल्याला प्रचिती येते, महिंद्रा च्या ह्या इलेक्ट्रिक थार ची डिझाइन आणि लूक्स बघता हि एक futuristic car म्हणून डिझाइन करण्यात आली आहे , ह्यामुळे गाडी खूप आकर्षक दिसत आहे आणि ह्या लुक चा नक्कीच कंपनी ला फायदा होईल असे दिसून येत आहे. सध्या ह्याची किंमत इतर इलेक्ट्रिक गाड्या बघता जवळपास २० ते २५ लाख रुपये असण्याची शक्यता आहे. तरी कंपनी कडून ह्याची किंमत काय असेल हे अजून सांगण्यात आलेले नाही आहे. गाडी बद्दल अजून माहिती तुम्ही इथे घेऊ शकता

तसेच आमच्या इतर लेख वाचण्या साठी इथे क्लिक करा !!

मित्रांसोबत शेअर करा !!

Leave a Comment