Police Bharti 2024 : महाराष्ट्र सरकार ने काढली मेगा पोलीस भरती!! तब्बल १७४७१ पदे भरली जाणार!

Police Bharti 2024
Police Bharti 2024

Police Bharti 2024 : महाराष्ट्र सरकारने मेगा पोलीस भरती ची घोषणा केली आहे, आणि लवकरच हि पोलीस भरती साठी जाहिरात महाराष्ट्र सरकार गृह विभागाकडून कडून प्रदर्शित करण्यात येणार आहे. मागील काही वर्षांपासून पोलीस विभागामध्ये जवळपास ७५००० पद रिक्त होती पण कोरोना मुले आणि नंतर सतत च्या सरकार बदली मुले हि पदे भरण्यात आली नव्हती तरी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरती प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडण्याचे संकेत दिले आहे.

Police Bharti 2024 : कोणकोणत्या पदासाठी आहे भरती?

Police Bharti 2024 : पोलीस भरती 2024 साठी चा GR जाहीर झाला असून ह्यामध्ये जवळपास १७४७१ पदांसाठी हि भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ज्यामध्ये २०२२-२३ म्हणजेच ३१-१२-२०२३ च्या अखेर पर्यंत राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई, बॅन्ड्समन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई अश्या जागा भरण्यात येणार आहेत .

Police Bharti 2024 Date : पोलीस भरती 2024 भरती प्रक्रिया कधी सुरु होणार?

Police Bharti 2024 : पोलीस भरती 2024 महाराष्ट्र राज्यात एकूण ७५००० पदे रिक्त होती जी मागील वर्षांपासून भरण्यास सुरुवात झाली आहे. एवढ्या मोठ्या तुटवड्या मुळे पोलीस प्रशासनावर खूप जास्त ताण येत होता आणि कायदा सुव्यस्ततेचा प्रश्न सुद्धा खूप वेळेस उभा राहत होता, ह्यामुळेच सरकार वर पण पोलीस भरती प्रक्रिये साठी दबाब आणणे सुरु होता. म्हणून शासनाने ह्यावर लवकर निर्णय घेऊन येणाऱ्या महिन्यातच म्हणजे फेब्रुवारी २०२४ मध्ये पोलीस भरती ची प्रक्रिया सुरु करण्याचा आदेश दिला आहे आणि त्या प्रमाणे शासनाकडून तास GR देखील काढण्यात आला आहे. तसेच Maharashtra Police Bharti 2024 online Form Date लवकरच संबंधित विभागाकडून जाहीर करण्यात येणार आहे.

Police Bharti 2024 : पोलीस भरती 2024 काय असेल भरती प्रक्रिया ?

महाराष्ट शासनाने वेगवेगळ्या शिपाई पदांसाठी हि भरती प्रक्रिया करणार आहे ज्यामध्ये कमीत कमी अर्ज करणाऱ्यास १२ वि उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे, तसेच पोलीस शिपाई चालक पदासाठी १२ वी सोबतच अवजड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहे . भरती प्रक्रिये मध्ये मागील वेळेस प्रमाणे अगोदर लेखी परीक्षा होतील आणि त्यानंतर शारीरिक चाचणी होईल अशी माहिती आहे. अधिक माहिती पोलीस भरती च्या अधिकृत संकेत स्थळ https://www.mahapolice.gov.in/ ला भेट देऊ शकता .

कोणत्या पदासाठी किती जागा ?

विभागाचे नावपोलीस गृह खाते
पोलीस शिपाई १४९५६ पदे
पोलीस शिपाई चालक २१७४ पदे
राखीव पोलीस दल १२०४ पदे
एकूण पदे १७४७१ पदे

अश्याच माहिती साठी www.dotmarathi.com च्या संकेत स्थळ ला भेट द्या

मित्रांसोबत शेअर करा !!

1 thought on “Police Bharti 2024 : महाराष्ट्र सरकार ने काढली मेगा पोलीस भरती!! तब्बल १७४७१ पदे भरली जाणार!”

Leave a Comment