Teacher Recruitment Maharashtra : महाराष्ट्रात मेगा शिक्षक भरती, तब्बल २१ हजार पेक्षा जास्त जागा निघणार!!

Teacher Recruitment Maharashtra : महाराष्ट्रातल्या बी.एड आणि डी .एड झालेल्या तरुणांसाठी खूप आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्रात लवकरच मेगा शिक्षक भरती निघणार आहे ज्यामध्ये २१ हजार पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहे आणि अशी घोषणा महाराष्ट्र सरकार कडून करण्यात आली आहे. आणि ह्या मध्ये राज्यातील जिल्हा परिषद आणि खाजगी शिक्षण संस्था मधील जवळपास २१ हजार पेक्षा रिक्त जागा भरण्यात येणार आहेत .

Teacher Recruitment Maharashtra : एकूण किती जागांसाठी आहे भरती ?

Teacher Recruitment Maharashtra : राज्य सरकार च्या शिक्षण विभाग तर्फे शिक्षक भरतीस पात्र असलेल्या उमेदवारांसाठी पवित्र पोर्टल सुरु केले आहे ज्या मध्ये दिलेल्या जाहिराती नुसार राज्यातील असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी संस्थांमधील शिक्षकांच्या एकूण २१,६७८ जागा रिक्त आहेत आणि ह्याच पदांच्या भरती साठी मागणी नोंदविण्यात आली होती. पवित्र पोर्टल वर जाहिरात नुसार राज्यातील एकूण ३४ जिल्हा परिषदांच्या १२५२२, मनपाच्या एकूण २९५१, नगर पालिका ह्यांचा ४७७ व खासगी शिक्षण संस्था यांच्या ५७२८ अश्या एकूण २१६७८ रिक्त पदांच्या भारती या ठिकाणी करण्यात येणार आहे.

Teacher Recruitment Maharashtra कशी होणार हि शिक्षक भरती ?

Teacher Recruitment Maharashtra : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी संस्था नुसार २१,६७८ जागा रिक्त आहेत, त्यानुसार ह्याच जागांसाठी मुलाखतीशिवाय १६,७९९ आणि मुलाखतीसह ४,८७९ पदांची प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यामधील स्वराज्य संस्था आणि खासगी संस्था मध्ये पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक पद भरती साठी आणि शिक्षण सेवक भरती साठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ मध्ये ऑन लाईन पद्धतीने घेतली होती.

ह्या चाचणी साठी एकूण २ लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि ह्याच चाचणी च्या गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य आणि खासगी संस्था मध्ये पहिली ते बारावी साठी शिक्षक आणि शिक्षण सेवक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

Teacher Recruitment Maharashtra :कोणत्या जात प्रवर्ग साठी किती आहेत जागा ?

Teacher Recruitment Maharashtra : पवित्र पोर्टल वर देण्यात आलेल्या जाहिराती नुसार एकूण २१६७८ जागांपैकी खालील प्रमाणे रिक्त पदांचा तपशील आहे.

जात प्रवर्ग रिक्त जागा
अनुसूचित जाती (SC)३१४७
अनुसूचित जमाती (ST)३५४२
विमुक्त जाती (अ ) (NT A)८६२
भटक्या जमाती (ब ) (NT B)४०४
भटक्या जमाती (क) (NT C)५८२
भटक्या जमाती (ड ) (NT D)४९३
विशेष मागास प्रवर्ग २९०
इतर मागास प्रवर्ग (OBC)४०२४
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (ews)२३२४
खुला प्रवर्ग (OPEN)६१७०

गट निहाय रिक्त पदे

गट रिक्त पदे
इ . १ ली ते ५ वी १०२४०
इ . ६ वी ते ८ वी ८१२७
इ. ९ वी ते १० वी २१७६
इ. ११ व्ही ते १२ वी ११३५

माध्यम निहाय रिक्त पदे :

माध्यम रिक्त पदे
मराठी १८३७३
इंग्रजी ९३१
उर्दू १८५०
हिंदी ४१०
गुजराती १२
कन्नड ८८
तमिळ
बंगाली
तेलूगू

अधिक माहिती साठी शिक्षक भरती च्या ऑफिशिअल पवित्र पोर्टल ची लिंक

तसेच आमचे इतर लेख वाचण्या साठी ह्या लिंक वर क्लिक करा

पोलीस भरती च्या माहिती बद्दल वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मित्रांसोबत शेअर करा !!

Leave a Comment