Maharashtra Police Bharti 2024 Last Date : महाराष्ट्र पोलीस भरतीच्या शेवटच्या तारखेत वाढ !!

Maharashtra Police Bharti 2024 Last Date : महाराष्ट्र पोलीस भरती ची प्रक्रिया सध्या चालू आहे. ह्यामध्ये सध्या भरती साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्रात एकूण १७००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया चालू आहे.

Maharashtra Police Bharti 2024 : कोणकोणत्या पदासाठी आहे भरती ?

Maharashtra Police Bharti 2024 : पोलीस भरती 2024 साठी चा GR जाहीर झाला असून ह्यामध्ये जवळपास १७४७१ पदांसाठी हि भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ज्यामध्ये २०२२-२३ म्हणजेच ३१-१२-२०२३ च्या अखेर पर्यंत राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई, बॅन्ड्समन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई अश्या जागा भरण्यात येणार आहेत .

Maharashtra Police Bharti 2024 Last Date : काय आहे शेवटची तारीख?

महाराष्ट्र पोलीस भरती साठी अगोदर शेवटची तारीख हि ३१ मार्च २०२४ हि ठेवण्यात आली होती परंतु फॉर्म भरण्याच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता ह्या भरती प्रक्रिये ची फॉर्म भरण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. आता देण्यात आलेल्या नवीन माहिती नुसार १५ एप्रिल २०२४ हि नवीन तारीख देण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्ही Maharashtra Police Bharti च्या ऑफिशीअल वेबसाईट ला देऊ शकता .

तसेच पोलीस भरती २०२४ च्या इतर माहिती साठी ह्या लिंक वर क्लीक करा

मित्रांसोबत शेअर करा !!

Leave a Comment

Exit mobile version