Candidates Chess Tournament : कॅनडा तील टोरांटो येथे खेळण्यात येणाऱ्या Candidates Chess Tournament मध्ये भारताच्या डी गुकेश D Gukesh याने जेते पद पटकावले आहे. आणि ह्यासोबत च तो हा खिताब जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. भारताचा सुपर स्टार चेस पटू विश्वनाथन आनंद ह्याच्या नंतर तो जिंकणारा तो दुसरा खेळाडू आहे. ह्या अगोदर विश्वनाथन आनंद ने हा खिताब जिंकला आहे. डी गुकेश याने गॅरी कास्पारोव्ह यांचा ४० वर्षापासूनच रेकॉर्ड तोडला आहे.
त्याचे हे यश पाहून विश्वनाथन आनंद याने X ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर त्याचे अभिनंदन केले आहे, ज्यामध्ये विश्वनाथन आनंद ने म्हंटले आहे कि मला तुझा खूप जास्त अभिमान आहे, ज्याप्रमाणे तू परिस्तिथी सांभाळली आणि खेळ खेळला त्याबद्दल तुझे खूप अभिनंदन.
D Gukesh 14व्या आणि अंतिम फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुरासोबत सहज ड्रॉ खेळला आणि 14 पैकी नऊ गुणांसह स्पर्धा पूर्ण केली. या विजयामुळे गुकेशला या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या सामन्यात सध्याचा विश्वविजेता चीनच्या डिंग लिरेनचे आव्हान असणार आहे. चेन्नईच्या या युवा बुद्धिबळपटूने कास्पारोव्हच्या विक्रमात बरीच सुधारणा केली.
विजयानंतर गुकेश म्हणाला की, ‘खूप आनंद झाला. मी फॅबियो कारुआना आणि इयान नेपोम्नियाच्ची यांच्या खेळाचे देखील अनुसरण करत होतो. त्यानंतर मी ग्रेगॉर्ज गजेव्स्की या दुसऱ्या खेळाडूशी बोललो, मला वाटते की त्याचा फायदा झाला.
गुकेश ला हि स्पर्धा जिंकल्यानंतर 88,500 युरो चे रोख बक्षीस मिळाले आहे जे अंदाजे 78.5 लाख भारतीय रुपयांचे आहे. ही स्पर्धा जिंकणारा गुकेश हा दुसरा भारतीय खेळाडू आहे या अगोदर ग्रँड मास्तर विवश्वनाथन आनंद ने हि स्पर्धा जिंकलेली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी Dot Marathi इथे क्लीक करा!!