Costal Road Project Mumbai : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अश्या मुंबई तील कोस्टल रोड चे पहिल्या फेज चे काम पूर्ण झाले आहे आणि ह्या कामाचे उद्धघाटन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ह्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. ह्या पहिल्या फेज मध्ये वरळी ते मरीन ड्राईव्ह पर्यंत चे काम पूर्ण करण्यात आले आहे.
दिनांक 11 मार्च रोजी ह्या कोस्टल रोड Costal Road Project Mumbai चे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. पहिल्या फेज मध्ये वरळी ते मरिन ड्राईव्ह असे 10.5 km चे काम पूर्ण झाले आहे आणि हा रास्ता आता सामान्य जनतेसाठी खुला करून देण्यात आला आहे.
ज्यामुळे मुंबई ला ट्रॅफिक पासून थोडा तरी दिलासा मिळणार आहे, आता गाड्यांना वरली ते मरीन ड्राईव्ह असे अंतर फक्त 10 मिनटात पार करता येणार आहे. अगोदर हे अंतर कापण्यासाठी 40 ते 45 मिनिटांचा वेळ अंदाजे लागत होता. पण आता ह्या कोस्टल रोड मुळे वाहन धारकांना खूप सुविधा होणार आहे.
Costal Road Project Mumbai : काय आहे कोस्टल रोड प्रोजेक्ट?
Costal Road Project Mumbai : कोस्टल रोड प्रोजेक्ट हा कांदिवली ला मरिन लाईन ला जोडण्याचा प्रकल्प आहे ज्यामध्ये पहिल्या फेज मध्ये हे काम मरीन ड्राईव्ह पासून पासून वरळी पर्यंत हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यात आला आहे. मुंबई कोस्टल रोड ची घोषणा 2011 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चौहान ह्यांच्या द्वारे करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव हा प्रोजेक्ट पुढे गेला नाही. नंतर 2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांच्या जाहीरनामा मध्ये त्यांनी हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट चा समावेश केला होता. 2015 मध्ये हा प्रोजेक्ट ला संमती मिळाली नंतर 2018 मध्ये ह्या प्रोजेक्ट मध्ये सुरुवात झाली. तरी मध्यंतरी 6 महिने सुप्रीम कोर्ट ह्या प्रोजेक्ट वर काही कारणाने बंदी घातली होती, नंतर ह्या प्रोजेक्ट ला 2019 मध्ये सुरुवात करण्यात आली.
Costal Road Project Mumbai : किती होता ह्या प्रोजेच साठी खर्च ?
Costal Road Project Mumbai : मुंबई च्या ह्या कोस्टल रोड प्रोजेक्ट ची सुरुवात/घोषणा 13 ऑक्टोबर 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी केली होती, हा त्यांचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प होता आणि त्यांनी ह्यासाठी खूप प्रयत्न केले होते. ह्या प्रोजेक्ट साठी जवळपास 12,771 कोटी रुपयांचे बजेट होते.
सोबतच ह्या कोस्टल रोड प्रोजेक्ट वर 320 एकरात पसरलेले जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे आणि त्या पार्क ला धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड असे नाव दिले जाणार आहे असे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ह्यांनी सांगितले आहे.
Mumbai Coastal Road map : कसा असेल एकूण कोस्टल रोड चा मॅप ?
Mumbai Coastal Road map : कोस्टल रोड हा मुंबई च्या मरीन लाईन पासून सुरु होऊन कांदिवली पर्यंत जाणारा 29.8 KM चा मार्ग असणार आहे. ज्यामध्ये फेज 1 मध्ये हा 8 लेन चा रोड असणार आहे जो मरीन लाईन पासून सुरु होणार आहे त्यानंतर कोस्टल रोड हा 2 किलोमीटर भुयारी मार्गातून जाणार आहे. ज्यामध्ये गिरगाव चौपाटी आणि मलबार हिल्स असतील त्यानंतर प्रियदर्शनी पार्क मध्ये ह्या भुयारी मार्गाची ओपनिंग असेल. प्रियदर्शनी पार्क पासून हाजी अली आणि वरळी मध्ये बांद्रा वरळी सी लिंक ला हा कोस्टल रोड जोडण्यात येणार आहे.
फेज 2 मध्ये हा कोस्टल रोड बांद्रा च्या सेंट अँड्रू चर्च पासून सुरु होणार आहे ते कोर्टर रोड, जॉगर्स पार्क पर्यंत जाणार आहे पुढे जुहू बेच पासून पुन्हा भुयारी मार्ग सुरु होऊन राजीव गांधी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी पर्यंत हा भुयारी मार्ग असणार आहे. तिथून मढ आयलंड ते गोरेगाव पासून कांदिवली पर्यंत हा कोस्टल रोड जाणार आहे.
अधिक माहिती साठी BMC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊ शकता.!!
Table of Contents
आमचे इतर लेख वाचण्यासाठी Dot Marathi इथे क्लिक करा !!