Tourist Places at Nashik : नाशिक मध्ये फिरायला येताय ? मग ह्या ठिकाणी नक्की जाऊन या!

नाशिक शहराचा इतिहास : नाशिक शहराला खूप मोठा इतिहास आहे म्हणजे सांगायला झालं तर प्रभू श्री राम यांचा नामोल्लेखापासून या शहराचा इतिहास सुरु होतो. पण ह्या शहराची ओळख त्या पासून पण जुनी आहे. नाशिक जिल्ह्याला महान पौराणिक पार्श्वभूमी आहे. भगवान राम आपल्या वनवासा दरम्यान पंचवटी येथे वास्तव्य करीत होते आणि त्यांनी आपल्या वनवासाचा बराच काळ इथे घातला. त्यानंतर अगस्ती ऋषी तपस्यासाठी नाशिकमध्ये राहिले होते , गोदावरी नदी चा उगम सुद्धा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथुन उगम पावते. बारा ज्योतिर्लिंग पैकी एक त्र्यंबकेश्वर शिव मंदिर त्र्यंबक नाशिक येथेच आहे. Tourist Places at Nashik

नाशिक ला ऐतिहासिक वारसा सोबत नाशिक ने काही भारताला अनेक प्रसिद्ध व्यक्तीमत्व सुद्धा दिले आहेत. ज्यामध्ये वीर सावरकर, अनंत कान्हेरे, लोकमान्य टिळक, दादासाहेब पोतनीस, बाबूभाई राठी, व्ही.व्ही. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर हि काही प्रसिद्ध नावे आहेत. नाशिकला मिनी महाराष्ट्र असेही म्हणतात, कारण सुरगाणा, पेठ, इगतपुरीचे हवामान कोकण सारखे आहेत. निफाड, सिन्नर, दिंडोरी, बागलाण हे पश्चिम महाराष्ट्र सारखे आणि येवला, नांदगाव, चांदवड ब्लॉक विदर्भ विभागा सारखे आहेत. नाशिक जिल्ह्यातील नाशिक, मालेगाव, मनमाड, इगतपुरी अशी काही मोठी शहरे आहेत.

Tourist Places Near Nashik : नाशिक शहरात कोणकोणते मुख्य पर्यटन स्थळ आहेत ?

Tourist Places Near Nashik : नाशिक ची ओळख सर्वात जास्त इथल्या धार्मिक पार्श्वभूमी वरून आहे, परंतु इथे मागच्या काही वर्षात झालेल्या औधोगिक भरभराटी मुळे नाशिक हे Wine Capital Of India म्हणून देखील ओळखले जात आहे. तर खाली आपण पाहू या ह्या शहरातील महत्वाचे पर्यटन स्थळ जिथे तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे.

List of Tourist Places at Nashik

1. श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर.

Tourist Places at Nashik : श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे नाशिक शहरापासून जवळ पास २८ किलोमीटर अंतरावर आहे. आणि नाशिक रोड च्या रेल्वे स्टेशन पासून जवळपास ४० किलोमीटर अंतरावर आहे. श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे, सध्या च्या मंदिराचे बांधकाम हे पेशवा बाजीराव बल्लाळ भट ह्यांच्या काळात त्यांच्याच आदेशावरून केलेले आहे. त्या अगोदरचे मंदिर हे औरंगजेब च्या सांगण्यावरून पाडण्यात आले होते. भारतातील सर्वात मोठी दुसरी नदी म्हणजे गोदावरी नदी चा उगम स्थान पण इथेच आहे.

Tourist Places at Nashik
Tourist Places at Nashik : Shri Trimbakeshwar Jyotirling Temple

हे प्राचीन मंदिर ब्रह्मगिरी निलगिरी आणि कलागिरी ह्या तीन पर्वतांच्या मध्ये उभे आहे, आणि मंदिर मध्ये पण तीन शिवलिंग आहेत जे ब्रह्म विष्णू आणि शिव ह्याचे प्रतीक मानले जाते. मंदिराच्या आसपास खूप च छान असा निसर्ग आहे आणि इथे आणि इथे वर्षाच्या बाराही महिने आपल्याला गर्दी बघायला मिळते.

2. कुशावर्त तिर्थ :

tourist places near nashik
tourist places near nashik


Tourist Places at Nashik :
कुशावर्त तीर्थ हा त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यभागी स्थित आहे. येथे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून लगेच ३०० मीटरांची दूरी आहे. इथे २१ फुटच्या खोलीत नैसर्गिक पाण्याचे झरे असताना १७५० साली एक कुंड बांधले गेले होते. गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावरून लुप्त झाल्यानंतर ह्या स्थळावरती काही लोकांची श्रध्दा आहे. कुशावर्तात आपले धार्मिक कर्त्यांनी स्नान करून त्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनार्थ जातात. येथील पाण्याचे झरे व गोदावरीच्या उगमस्थानानंतरच्या नदीप्रवाहाच्या कुशावर्तात येऊन पुढे विसरून घेतात. कुशावर्तात छोटे-मोठे मंदिर आहेत, उतरण्यासाठी १५ दगडी पायर्‍या आणि चार बाजू आहेत. इथेच संरक्षणात्मक जाळी लावली आहे. इथे गौतम ऋषींनी प्राचीन काळी गंगेला अडवले होते आणि तीर्थस्थळावर पुण्यस्नान केला होता, ह्याची पौराणिक कथा आहे.

3.रामकुंड

tourist places in nashik
tourist places in nashik

Tourist Places in Nashik : रामकुंड हा नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात आहे, आणि या स्थळावर वनवासादरम्यान प्रभु राम यांनी स्नान केले होते, अशी मान्यता आहे. या कुंडाच्या जवळचं ‘अस्थिविलय तीर्थ’ आहे. ह्या रामकुंडाचे बांधकाम सातारा जिल्ह्यातील खटावच्या जमिनदार श्री. चित्रराव खटाव यांनी १६९६ मध्ये केले. श्री. श्रीमंत माधवराव पेशवे (चौथे पेशवे) यांच्या मातोश्री श्रीमती गोपिकाबाई यांनी नंतरच्या काळात रामकुंडाची दुरुस्ती केली. येथे भाविक त्यांच्या मृत नातेवाइकांच्या अस्थि अस्थिविलय ह्या कुंडात विसर्जित करतात. महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक महान नेत्यांच्या अस्थि रामकुंडात विसर्जित केल्या आहेत.

4 पंचवटी :

Tourist Places in Nashik
Tourist Places in Nashik

Tourist Places in Nashik : नाशिक शहरामध्ये मध्यभागी ठिकाणी पंचवटी हा परीसर आहे आणि हा गोदावरी नदीच्या डाव्यातीरावर आहे. इथेच सुप्रसिद्ध काळाराम मंदीर आहे, आणि त्याला काळाराम मंदिर जवळ ५ वटवृक्षांचा समुह आहे हा समुह पाच वटवृक्षांपासून तयार झाला असल्या मुले ह्या परिसरास ‘ पंचवटी ’ असे संबोधले जाते. ह्याचा अर्थ ‘पंच’ म्हणजे पाच व ‘वटी’ म्हणजे वडाचे झाड असा आहे.

ह्या परिसरात आपल्याला खूप मंदिरे बघायला मिळतात काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, गंगा-गोदावरी मंदिर, सुंदर नारायण मंदिर, टाळकुटेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, गोराराम मंदिर, मुरलीधर मंदिर, तिळभांडेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, सांडव्याची देवी मंदिर, विठ्ठलमंदिर, पाताळेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, रामकुंड, दुतोंडया मारुती, कार्तिकस्वामी मंदिर, काटयामारुती मंदीर, पंचमुखी हनुमान मंदिर, भद्रकाली मंदिर, कपुरथळा स्मारक अशी अनेक मंदिरे पंचवटी व सभोवतालच्या परिसरामध्ये गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर आहेत. या मंदिरांमुळेच नाशिकला ‘’पश्चिम भारताची काशी ‘’असे म्हटले जाते.

५ पांडव लेणी :

Tourist Places in Nashik
Tourist Places in Nashik

Tourist Places in Nashik : नाशिक शहरापासून ५ किमी च्या अंतरावर आहेत पांडव लेणी आहेत. आणि हे पण एक खूप मोठे प्रसिद्ध स्थळ आहे नाशिक शहराच्या डोंगर रंग ला एका मोठ्या टेकडीवर ह्या लेण्या आहेत. हि पांडव लेणी प्राचीन आहेत, ह्या लेणी चा इतिहास सुमारे २५०० वर्षापूर्वींचा आहे . ह्या लेणी मध्ये पाली भाषेतील शिलालेख आहे आणि त्या वरून असे समजते कि हि लेणी सुमारे २५०० वर्षांपूर्वीची आहे . ह्या लेणी मधील काही मुर्त्या अजून हि चांगल्या स्वरूपात आहेत तर काही खंडित झाल्या आहेत. ह्या लेणी मध्ये आपल्याला बुद्धस्तुप, भिक्षूंची निवास स्थाने, बुधबोधिसविता, जैन तीर्थकर ऋषभदेवजी, वीर मणिभद्रजी, माता अंबिकादेवी यांच्या मूर्त्या पाच पांडवसदृशमूर्त्या, भीमाची गदा, कौरव मूर्त्या, इंद्रसभा, देवादिकांच्या मूर्त्या या अश्या सगळ्या आपल्याला ह्या लेण्यांमध्ये पाहायला मिळतात ज्याची शिल्पकला खुप आकर्षक आहे.

6. श्री सोमेश्वर मंदीर

tourist places near nashik
tourist places near nashik

नाशिक शहरा पासून गंगापूर रस्त्यावर ८ किमी च्या अंतरावर श्री सोमेश्वर महादेव चे मंदिर आहे, आणि हे मंदिर गोदावरी नदी च्या किनारी आहे. हा परिसर निसर्गाने वेढलेला असून इथे महादेवाच्या पिंडी सोबत हनुमानाची मूर्ती सुद्धा आहे. ह्या परिसरात गोदावरी नदी असल्याने तिथे बोटिंग ची सुद्धा व्यवस्था आहे. आणि खूप सारे पर्यटक इथे बोटिंग चा आनंद घेत असतात, सोबतच इथे खूप साऱ्या चित्रपटाच्या शूटिंग सुद्धा होत असतात.

7. सुला वाईन यार्ड :

Sula_wineyards
Sula_wineyards

Pic By Puneets26 –

सुला वाईन यार्ड हे नाशिक शहरापासून १२ किमी अंतरावर आहे आणि हे स्थळ पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ह्याची सुरुवात १९९९ मध्ये राजिव सामंत यांनी केली होती आणि हा भारताचा सर्वात मोठा वाईन ब्रँड आहे सुला व्हिनयार्ड्स ही भारतातील आघाडीची द्राक्षारस निर्माता कंपनी आहे, जी नाशिकच्या डोंगराळ भागात गंगापूर धरणाच्या काठावर वसलेली आहे.

इथे ह्यांनी एक संपूर्ण पिकनिक स्पॉट सारखा सेटअप केला आहे जिथे तुम्हाला द्राक्षांच्या बाग मध्ये फिरायला मिळेल सोबत च ह्याच्या वाईन ची टेस्टिंग सुद्धा करायला मिळेल. इथे खूप मोठा प्लेयिंग एरिया पण आहे जिथे तुम्ही फॅमिली सोबत एन्जॉय करू शकता आणि सोबतच रेस्टॉरंट पण आहे. हा एक भारतातील पहिला वायनरी रिसॉर्ट आहे जिथे तुम्ही राहू सुद्धा शकता.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी तुम्ही Dot Marathi ह्या लिंक वॉर क्लिक करा

मित्रांसोबत शेअर करा !!

Leave a Comment