Mukhyamantri Annapurna Yojana : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना मिळणार ३ मोफत गॅस सिलेंडर!!

Mukhyamantri Annapurna Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhyamantri Annapurna Yojana : महाराष्ट्र सरकार मार्फत आणि मुख्यमंत्री यांच्या प्रयत्नातून एक महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकार ने आणली आहे, ज्या मध्ये राज्यातील गरीब कुटुंबांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला ३ मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे . या योजनेतून गरीब कुटुंबांचा आर्थिक भार कमी करून गरीब कुटुंबातील महिलांना चूल आणि त्यापासून निघणाऱ्या धुरापासून मुक्ती देण्याचा संकल्प आहे तसेच गाव खेड्यांनी होणाऱ्या प्रदूषण वर आळा बसविण्याचा प्रयत्न आहे .

काय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ?

Mukhyamantri Annapurna Yojana : राज्यातील काही गाव खेड्यांमध्ये अजुनपण स्वयंपाक आणि इतर गोष्टींसाठी इंधन म्हणून लाकूड आणि कोळश्यांचा वापर केला जातो, ह्या लाकूड आणि कोळस्याच्या वापरामुळे प्रदूषण तर होतेच पण महिलांच्या आरोग्यावर पण धूर आणि इतर हानीकारण वायू मुळे विविध आजार उद्भवू शकतात आणि ह्यांच गोष्टींचा विचार करून २ ० २ ३ -२ ० २ ४ च्या महाराष्ट्राच्या आर्थिक बजेट मध्ये अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी राज्यातील गरीब आणि आर्थिक रित्या कमजोर महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणली आहे, ज्यामध्ये ५ सदस्य असलेल्या गरीब कुटुंबांना वर्षातून ५ गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना साठी काय आहे अटी आणि पात्रता ?

Mukhyamantri Annapurna Yojana : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी महाराष्ट्र सरकार ने GR काढला आहे आणि ह्या GR नुसार फक्त गरीब आणि वंचित कुटुंबातच ह्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून शासनाने ह्या योजनेसाठी काही अटी आणि पात्रता ठेवल्या आहेत त्या खालील प्रमाणे आहेत .

  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लाभार्थी महिला कडे राशन कार्ड असणे आवश्यक आहे .
  • लाभार्थी महिले च्या नावाने गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे .
  • योजने अंतर्गत एका रेशन कार्ड वर फक्त एकच लाभार्थी पात्र असेल .
  • योजने अंतर्गत फक्त ५ सदस्यीय परिवाराचं योजनेसाठी पात्र असेल .
  • लाभार्थीला घरघुती सिलेंडर १ ४ .२ किलो चे सिलेंडर च भरून मिळेल .
  • लाभार्थ्याला एका महिन्यात फक्त एकच सिलेंडर मिळेल .
  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ह्या योजनेसाठी पात्र असतील .

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे mukhyamantri annapurna documents required

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे . mukhyamantri annapurna Yojana documents required

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखल
  • गॅस कनेक्शन / उज्वला योजना
  • बँक पासबुक
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा कराल ? mukhyamantri annapurna yojana apply online

mukhyamantri annapurna yojana apply online : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने ऑन लाईन तसेच ऑफ लाईन अर्ज करण्याची सुविधा दिलेली आहे त्या साठी तुम्ही दोन्हीही प्रकारे अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या ऑफिशिअल वेबसाइट वर अर्ज करू शकता. वेबसाईट वर तुम्हाला अगोदर नोंदणी करावी लागेल आणि दिलेल्या डाकुमेंट्स अपलोड करून फॉर्म भरावा लागेल भरलेला फॉर्म तुम्हाला तुमच्या जवळच्या गॅस वितरक कडे जमा करावा लागेल . सध्या या योजनेसाठी ऑफिशिअल वेबसाईट देण्यात आलेली नाही आहे. तरी तुम्ही तुमच्या जवळच्या गॅस वितरक कडे जाऊन ऑफ लाईन फॉर्म भरू शकता अधिक माहिती साठी आपल्या जवळच्या गॅस वितरकांना भेट द्या !

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना चा GR वाचण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करा

तसेच आमचे इतर लेख वाचण्यासाठी Dot Marathi इथे क्लिक करा !!

मित्रांसोबत शेअर करा !!

Leave a Comment