Lakhpati Didi Yojana : राज्यातील लाडकी बहीण योजनेला मिळालेला प्रतिसाद बघून अजून एक योजना महाराष्ट्र मध्ये केंद्र तसेच राज्य सरकार मार्फत आणली गेली आहे, ज्या मध्ये महिलांना ५ लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे हि योजना म्हणजे लखपती दीदी योजना आहे .
लखपती दीदी योजनेसाठी नुकतेच आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव आत आले होते आणि त्यांच्या उपस्थितीत लखपती दीदी योजनेचा कार्यक्रम पार पडला या लखपती दीदी योजनेमुळे देशातील स्त्रियांना पाच लाखापर्यंतचा लाभ मिळू शकतो ते कसे आपण या लेखात पाहू.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
Lakhpati Didi Yojana : जळगाव येथे झालेल्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास राज्यातील अकरा लाख लखपती दीदी ना प्रमाणपत्र देण्यात आले, तसेच लखपती दीदी योजनेअंतर्गत 2500 कोटी रुपयांचा निधी वाटप केला गेला आहे. बचत गटातील महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन लखपती दीदी करण्याचा प्रयत्न असून योजनेद्वारे दोन कोटी वरून तीन कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट आहे, असे या ठिकाणी सांगितले. या योजनेद्वारे दुर्लक्षित मातृशक्ती नारीशक्तीला आम्ही मागच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे विकसित भारताच्या वाटचालीत मोलाचा वाटा असलेल्या नारीशक्तीला लखपती दीदी योजनेतून सशक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
काय आहे लखपति दीदी योजना 2024 ?
लखपति दीदी योजना 2024 : महाराष्ट्रातील तसेच देशातील आर्थिक दृष्ट्या वंचित महिलांना भारत सरकारकडून बिनव्याजी पाच लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देणे हे या लखपती दीदी योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेद्वारे महिलांना आर्थिक अडचणी पासून दूर करून त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास आणि वाढवण्यास मदत होणार आहे. या योजनेद्वारे भारतातील महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निश्चय आहे.
उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी तसेच महिलांनी स्वतःचा उद्योग उभा करून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी एकूण तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे . या योजनेद्वारे भारत सरकार महिलांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून एक ते पाच लाखापर्यंत कर्ज देत आहे, हे कर्ज शून्य व्याजदरावर महिलांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे . याचा उद्देश एकच आहे महिलांना आत्मनिर्भर आणि लखपती बनवणे .
कोणाला मिळणार ह्या योजनेचा लाभ ?
देशातील महिलांच्या सबलीकरणासाठी ही योजना भारत सरकारने आणली आहे त्यामध्ये 18 ते 50 वयोगटातील महिला या लखपती योजनेसाठी अर्ज करू शकतात. घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरी धारण नसलेली महिला किंवा ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशी महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते. या योजनेसाठी महिला राज्यातील मूळ रहिवासी असणे आवश्यक असून बचत गटांमध्ये सहभागी होणे बंधनकारक आहे.
लखपती दीदी योजनेसाठी कसा कराल अर्ज ? Lakhpati Didi Yojana Online Apply
Lakhpati Didi Yojana Online Apply : लखपती दीदी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज लवकरच सुरू करण्यात येणार आहे तरी या योजनेसाठी सध्या आपल्याला ऑफलाइन अर्जच करणे आहे. यामध्ये महिलांना सेल्फ हेल्प ग्रुप व्यवसाय योजना तयार करावी लागेल आणि व्यवसाय आराखडा तयार झाल्यानंतर ही बचत गट योजना आणि अर्ज सरकारकडे पाठवावा लागेल सरकारकडून या अर्जांची छाननी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया केले जाईल आणि तुमचा अर्ज स्वीकारला गेल्यास तुम्हाला कळवण्यात येईल यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
लखपती दीदी साठी लागणारी कागद पत्रे !
लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्र लागतील !!
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- आधार शी संलग्न बँक खाते
- उत्पन्नाचा दाखला
- बचत गट सदस्य नोंदणी
या योजनेबद्दल अधिक माहिती साठी इथे क्लिक करा !!
तसेच आमचे इतर लेख वाचण्यासाठी Dot Marathi इथे क्लिक करा !!