मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या युती सरकार ने अंतरिम बजेट मध्ये महाराष्ट्रातील स्त्रियांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. या मध्ये २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना महाराष्ट्र सरकार कडून दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहे. अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी मांडलेल्या अंतरिम बजेट मध्ये ह्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना Ladli Behna Yojna Maharashtra ची घोषणा करण्यात आली. १ जुलै पासून ह्या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
Ladli Behna Yojana Maharashtra : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे?
Ladli Behna Yojana Maharashtra : अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी मांडलेल्या अंतरिम बजेट मध्ये राज्यातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. ज्या मध्ये वय वर्षे २१ ते ६० वयोगटातील महिलांचा समावेश आहे. राज्यातील महिलांना आणि मुलींना सावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी महाराष्ट्र सरकार मार्फत लाडकी बहीण योजना हि योजना राबविली जात असून ह्या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील जवळपास ३ कोटी महिलांना ह्या योजनेचा फायदा होणार आहे.
Ladli Behna Yojana Maharashtra : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी काय आहे पात्रता ?
Ladli Behna Yojana Maharashtra : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ला अर्ज करण्यासाठी पात्रता यादी:
- लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आहे.
- राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परितक्त्या आणि निराधार महिलांसाठी हि योजना आहे.
- लाभार्थी महिलांचे वय कमीत कमी २१ आणि जास्तीत जास्त ६० वर्षे आवश्यक आहे.
- लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वर्षीच्या उत्पन्न २.५ लाखापेक्षा जास्त नसावे.
- लाभार्थी महिलांकडे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असणे आवश्यक आहे.
Ladli Behna Yojana Maharashtra : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना साठी आवश्यक कागदपत्रे .
Ladli Behna Yojana Maharashtra : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ला अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.
- योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
- लाभार्थ्यांचे आधारकार्ड
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला .
- रेशनकार्ड
- पासपोर्ट फोटो
- योजनेच्या अटी पालन करण्याचे हमीपत्र
- राष्ट्रीय कृत बँकेचे खाते
Ladli Behna Yojana Maharashtra Online Apply : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना साठी कसा आणि कुठे भरायचा अर्ज?
Ladli Behna Yojana Maharashtra Online Apply : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईल वरून सुद्धा करू शकता किंवा महाराष्ट्र शासनाच्या सेतू सुविधा केंद्र वर सुद्धा तुम्ही अर्ज भरू शकता. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्या अंगणवाडी केंद्रात बाळ विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सुद्धा अर्ज भरून घेऊ शकतात.
Ladli Behna Yojana Maharashtra : कधी पासून होणार अर्जप्रक्रिया चालू?
Ladli Behna Yojna Maharashtra : ह्या योजना साठी ऑनलाईन अर्ज १ जुलै २०१४ पासून चालू होणार आहे, तर अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक १५ जुलै २०२४ असणार आहे. ह्या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी हि १६ जुलै २०२४ ला प्रकशित करण्यात येणार आहे, तर अंतिम यादी १ ऑगस्ट २०२४ ला प्रकशित करण्यात येणार आहे.
जर तात्पुरत्या यादी वर तुम्हाला काही हरकत व तक्रार असेल तर तुम्ही २१ जुलै ते ३० जुलै पर्यंत हरकत नोंदवू शकता. पात्र लाभार्थ्यांचे बँकेत EKYC करण्यासाठी १० ऑगस्ट पर्यंत ची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर प्रायटेक महिन्याच्या १५ तारखेपयंत पात्र लाभार्थ्यांना ह्या योजनेचे १५०० रुपये त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहेत.
कोण कोण असणार लाभापासून वंचित?
Ladli Behna Yojana Maharashtra : ह्या योजनेसाठी कोण महिला अपात्र असेल हे पण राज्य सरकार ने सांगितले आहे ते खालील प्रमाणे राहतील.
- ज्या महिलांच्या कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक असेल.
- ज्या कुटुंबातील सदस्य आयकर भारत असतील.
- सादर लाभार्थी महिलेने शासन मार्फत राबवणीगायत येणाऱ्या विविध योजना मधून १५०० रुपयांपेक्षा अधिक लाभ घेतला असेल.
- ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार/खासदार असतील.
- ज्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे ५ एकर पेक्षा अधिक शेतजमीन असेल.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहन रजिस्टर असेल (ट्रॅक्टर वगळता)
- ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित/ कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संशय मध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेत आहेत.
Table of Contents
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा GR वाचण्यासाठी इथे क्लिक करा
आमचे बाकी लेख वाचण्यासाठी तुम्ही Dot Marathi इथे क्लिक करू शकता !!