Ladki Bahin Yojana Form : माझी लाडकी बहीण योजना फॉर्म ऑनलाईन कसा भरावा ?

Ladki Bahin Yojana Form
Ladki Bahin Yojana Form

Ladki Bahin Yojana Form : मित्रांनो अजून पण खूप साऱ्या महिलांचे माझी लाडकी बहीण योजना चे फॉर्म भरलेले नाहीत आणि हा फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन सेंटर कडून खूप जास्त रक्कम महिलांकडून उकळल्या जात आहे त्यामुळे महिलांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. ह्या माझी लाडकी बहीण योजना साठी महाराष्ट्र शासनाने एक अँप बनवली होती पण आता तुम्ही ह्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म वेबसाईट वरून पण भरू शकता.

ह्या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा याची पूर्ण माहिती तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप वाचायला मिळेल.

Mazi Ladki Bahin Yojana Official Website : लाडकी बहीण योजना साठी कोणती वेबसाईट ?

mazi ladki bahin yojana official website

mazi ladki bahin yojana official website : महाराष्ट्र सरकार ने माझी लाडकी बहीण योजना साठी एक वेगळी वेबसाईट सुरु केली आहे, आणि यांनंतर लाडकी बहीण योजनेचे सर्व फॉर्म हे याच वेबसाईट वर भरल्या जाणार आहे. योजने संबंधी सर्व माहिती आणि अपडेट्स तुम्हाला याच वेबसाईट वर मिळणार आहे तर ह्या वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे .

mazi ladki bahin yojana online form : माझी लाडकी बहीण फॉर्म कसा भरावा ?

mazi ladki bahin yojana online form : माझी लाडकी बहीण योजना चा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर mazi ladki bahin yojana official website ऑफिसिअल वेबसाईट वर जावं लागेल ज्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे . त्या नंतर वेबसाईट च्या उजव्या बाजूला तुम्हाला अर्जदार लॉग इन म्हणून ऑप्शन दिसेल त्यावर क्लीक करायचे आहे .

अर्जदार लॉग इन पेज वर क्लीक केल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्या मध्ये तुम्हाला खालील प्रमाणे पेज दिसेल.

त्या पेज वर तुम्हाला वरील चौकोनी रकान्यात दिलेल्या Create Account वर क्लीक करायचे आहे त्यानंतर अजून एक नवीन पेज येईल.

ह्या पेज वर आल्यावर तुम्हाला तुमची माहिती इथे भरायची आहे ज्या मध्ये सर्व प्रथम तुम्हाला तुमचे आधार कार्ड वर असल्या प्रमाणे तुमचे नाव मोबाईल नंबर शक्यतोवर तुमच्या बँक खात्याला लिंक असणारा मोबाईल नंबरच या ठिकाणी वापरावा . त्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड सेट करायचा आहे.
त्यांनंतर तुम्हाला District वर क्लीक करून तुमचा जिल्हा निवडायचा आहे, जिल्हा निवडल्यावर तुम्हाला तुमचा तालुका जो असेल तो निवडायचा आहे. तालुका निवडल्या नंतर तुमचं गाव हे तुम्हाला निवडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या तालुका ला असलेली नगर पालिका किंवा महा नगर पालिका याची निवड करायची आहे.
या नंतर एक महत्वाचा पॉईंट आहे जो आहे Authorized Person या ठिकाणी तुम्हाला तुम्ही जर सामान्य महिला असाल तर General Woman वर क्लीक करायच आहे आणि जर तुम्ही अंगणवाडी सेविका आशा वर्कर किंवा ग्राम सेवक असाल तर निवडायचं आहे .

त्यानंतर Terms and Conditions वर क्लीक करून पुढे Captcha टाकायचा आहे sign Up वर क्लीक करायचे आहे .

त्यानंतर तुम्ही दिलेली मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल तो otp तुम्हाला तिथे टाकून captcha टाकायचा आहे .

पुन्हा वरील पेज वर आल्यावर आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्ही टाकलेला पासवर्ड ह्या ठिकाणी टाकायचा आहे , त्यानंतर captcha टाकून लॉग इन वर क्लीक करायचे आहे .

लॉग इन केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल त्या पेज वर डाव्या बाजूला तुम्हाला Application of mukhyamantri mazi Ladki Bahin Yojna असे ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लीक करायचे आहे.

नंतर त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर तुम्हाला टाकावा लागेल आणि captcha टाकल्यानंतर नवीन पेज ओपन होईल त्या पेज वर तुम्हाला तुमची माहिती भरणे आहे

तुम्हाला तुमचे आधार कार्ड प्रमाणे नाव भरावे लागणार आहे, त्यानंतर तुमच्या पती किंवा वडिलांचे नाव, लग्नाअगोदर चे नाव , वैवाहिक स्तिथी आणि जन्म तारीख भरावी लागणार आहे . आणि जर तुम्ही महाराष्ट्रातले नागरिक असाल तर खाली हो किंवा नाही वर क्लीक करायचे आहे .

त्या नंतर तुम्हाला तुमचा रहिवासी पत्ता पिनकोड तालुका जिल्हा जवळची नगर पालिका किंवा महा नगर पालिका मतदार संघ निवडायचा आहे .

आणि त्या नंतर सगळ्यात महत्वाचे तुम्हाला तुमचे बँक खात्याच्या डिटेल्स भरायच्या आहे . ह्या मध्ये महत्वाचे कि तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या बँक खात्याचेच तुम्हाला डिटेल्स ह्या ठिकाणी भरायचे आहे . जर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक नसेल तर तुम्हाला ह्या योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होणार नाही .

त्या नंतर तुम्हाला तुमची कागदपत्रे अपलोड करायची आहे ते तुम्ही मोबाईल मध्ये फोटो काढून किंवा स्कॅन करून अपलोड करू शकता . ज्या मध्ये तुम्हाला आधार कार्ड चे पुढील आणि मागील प्रत त्यानंतर तुमचे डोमिसाईल सर्टिफिकेट, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, १ ५ वर्षांपासून जुने रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड ह्या पैकी एक तुम्ही अपलोड करू शकता .

त्यानंतर तुमच्या कडे असलेले रेशन कार्ड कोणते आहे ते तुम्हाला निवडायचे आई. पुढे तुम्हाला तुमचे सही केलेले हमीपत्र उपलोड कराचे आहे आणि नंतर बँक पासबुक ची प्रत अपलोड करायची आहे शेवटी तुमचा फोट तुम्हाला अपलोड करायचा आहे .

तुमचे सर्व documents हे 50 kb ते 5mb च्या मध्ये असणे आवश्यक आहे .

त्यानंतर तुम्हाला accept वर क्लीक करून submit वर क्लीक करायचे आहे .

अशा प्रकारे तुमचा Ladki Bahin Yojana Form माझी लाडकी बहीण योजना चा फॉर्म तुम्ही घरच्या घरी भरू शकता .

Mazi Ladki Bahin Yojana Official Website

माझी लाडकी बहीण योजनेची ऑफिशल लिंक साठी इथे क्लीक करा !!

Mazi Ladki Bahin Yojana Official Website

माझी लाडकी बहीण योजना साठी लागणाऱ्या हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र तुम्ही इथे क्लीक करू शकता.

लाडकी बहीण योजेचा अटी आणि शर्ती जाणून घेण्यासाठी आमचा लाडकी बहीण योजना अति शर्ती हा लेख वाचा.

मित्रांसोबत शेअर करा !!

Leave a Comment

Exit mobile version