Ashok Chavan : अशोक चव्हाण यांचा काँगेस ला राम राम ! भाजप मध्ये जाणार?

Ashok Chavan : काँग्रेस चे जेष्ठ नेते तसेच माजी मुख्यमंत्री अशोक राव चव्हाण यांनी काँग्रेस च्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे आणि हा राजीनामा त्यांनी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष श्री नाना पाटोळे ह्यांच्या कडे सुपूर्द केला आहे. सोबतच त्यांनी आपल्या विधानसभा सदस्य पदाचा सुद्धा राजीनामा दिला आहे.

Ashok Chavan यांनी काँग्रेस च्या सदस्यपदाचा आणि विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा देताच आपल्या सगळ्या सोशल मीडिया अकाउंट वरून आपला बायो मध्ये बदल केला आहे आणि काँग्रेस पक्षाची सर्व माहिती आणि पोस्ट काढून टाकली आहे

Ashok Chavan : राजीनामा नंतर अशोक चव्हाण काय म्हणाले ?

Ashok Chavan यांनी काँग्रेस च्या सदस्यपदाचा आणि विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना सांगितले कि सध्या कोणत्या पक्षा मध्ये प्रवेश करायचा आणि हे मी अजून ठरवले नई आणि आणि ह्या विषयावर अजून मी काही बोलू शकत नाही असे सांगितले .

Ashok Chavan : कालपर्यंत काँग्रेस च्या बैठकांमध्ये होते सक्रिय!

Ashok Chavan अशोक चव्हाण कालपर्यंत काँग्रेस च्या बैठकीमध्ये भाग घेत होते आणि आज अचानक त्यांनी काँग्रेस चा राजीनामा दिला आहे हे खूप जणांना पचले नाही आहे. ह्यावर उद्धव ठाकरे ह्यांनी सुद्धा आश्चर्य दाखवले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले काळ पर्यंत सीट वाटपासाठी अशोक चव्हाण आमच्या सोबत बैठकी घेत होते आणि आज अचानक त्यांनी राजीनामा दिला हे न समजण्यासारखे आहे.

Ashok Chavan : सोबत अजून काही आमदार देणार आपल्या विधान सभा सदस्य पदाचा राजीनामा?

Ashok Chavan अशोक चव्हाण यांनी विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कडे सकाळी राजीनामा दिला आणि विधान सभा अध्यक्ष यांनी तो राजीनामा मंजूर सुद्धा केला आहे. ह्या सगळ्या घडामोडी कडे बघता अशोक चव्हाण हे ऐकले नसून त्यांच्या सोबत इतर १०-१२ काँग्रेस आमदार सुद्धा आहेत असे समजत आहे. सध्या काही दिवसापूर्वीच काँग्रेस महाराष्ट्र चे दोन मोठे नेते बाबा सिद्दीकी आणि मिलिंद देवडा ह्यांनी सुद्धा काँग्रेस च्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता.

Ashok Chavan : अशोक चव्हाण ह्यांच्या राजीनामा नंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Ashok Chavan अशोक चव्हाण ह्यांच्या राजीनामा बद्दल बोलतांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि ह्याबद्दल माहिती त्यांना नुकतीच मिळाली आहे आणि त्यांच्या सोबत आमचे काही बोलणे झालेले नाही परंतु काँग्रेस चे खूप नेते आमच्या संपर्कात आहेत आणि काँग्रेस मद्ये त्यांची होणारी घुसमट बघता येणाऱ्या काळात काँग्रेस चे दिग्गज नेते काँग्रेस सोडतील आणि सोबत येतील अशी अशा आहे.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मित्रांसोबत शेअर करा !!

Leave a Comment

Exit mobile version