Article 370 Movie : चित्रपटाचा ट्रेलर रिलीज चित्रपटात यामी गौतम सोबत दिसणार हे मराठमोळे कलाकार आणि दिग्दर्शक!!

Article-370-Movie
Article 370 Movie

Article 370 Movie चा ट्रेलर लाँच झाला आहे आणि ह्याची सोशल मीडिया वर चांगलीच चर्चा बघायला मिळत आहे. हा चित्रपट २०१९ मध्ये झालेल्या Article 370 हे केंद्र सरकार कडून बरखास्त केल्यावर काय घडले व Article 370 रद्द करण्यासाठी सरकार, संस्था आणि इतर सगळ्या सरकारी संस्थांना काय काय तयारी आणि कोण कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला ह्यावर एकंदरीत आहे.

Article 370 Movie मध्ये कोण कोण आहेत कलाकार?

Article-370-Movie

प्रथमदर्शी ह्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये यामी गौतम दिसत आहे सोबतच दुसरा ओळखीचा चेहरा दिसतोय अरुण गोविल ह्यांचा ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची भूमिका ह्या चित्रपटामध्ये साकारली आले. सोबतच दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियमनी पण महत्वाच्या भूमिकेमध्ये आपणास बघायला मिळणार आहे. सोबतच राज जुतसी , दिव्या शेठ शाह आणि आपला मराठमोळे कलाकार वैभव तत्ववादी आणि किरण करमाकर सुद्धा महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे . चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये वैभव तत्ववादी एका आर्मी ऑफिसर च्या भूमिकेमध्ये दिसत आहे तर किरण करमाकर हे तत्कालीन गृहमंत्री अमित शाह ह्यांच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळणार आहे.

.वैभव ने अगोदर खूप साऱ्या मराठी सिरीयल आणि फिल्म्स मध्ये काम केले आहे, त्याला २०१५ मध्ये आलेल्या कॉफी आणि बरच काही ह्या मराठी फिल्म पासून घर घर पोहोचला होता. सोबतच संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी ह्या चित्रपटामध्ये पण वैभव चिमाजी अप्पा ह्या भूमिके मध्ये दिसला होता, ज्या भूमिकेसाठी त्याची सर्वत्र चर्चा झाली होती. सोबतच २०१६ मध्ये आलेल्या लिपस्टिक अंडर माय बुरखा मध्ये पण वैभव ने काम केले होते.

काय आहे Article 370 Movie चित्रपटाची स्टोरी ?

Article 370 Movie हि २०१९ मध्ये झालेल्या अनुच्छेद ३७० रद्द करण्यावर आहे आणि त्यासंबंधी झालेल्या काश्मीर मधल्या घटना आणि तिथली परिस्तिथी ह्यावर एकंदरीत हा चित्रपट लिहिलेला आहे आणि मूळ स्टोरी ह्या सगळ्या घटनांवरच आधारित आहे. सोबतच केंद्रीय संस्था आणि सरकार ने हि सगळी परिस्तिथी कशी हाताळली आणि काश्मीर मधील तणाव कमी करण्यासाठी काय पाऊल उचलले ह्यावरच संपूर्ण फिल्म च कथानक आहे असे ट्रेलर वरून दिसून येत आहे.

Article 370 Movie कोण आहेत डायरेक्टर आणि प्रोड्युसर ?

Article 370 Movie हा चित्रपट चे डायरेक्टर आदित्य सुहास जांभळे जे एक मराठी डायरेक्टर आहेत आणि ते दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते डायरेक्टर आहेत , जे गोवान चित्रपट याचे दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता आहेत. आदित्य जांभळे यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये बीई पूर्ण केल्यानंतर त्यांनी ‘श्री महालसा प्रॉडक्शन’ आणि ‘लोगोक्राझ’ या ग्राफिक डिझाइन कंपनीची स्थापना केली होती. त्याचा पहिला लघुपट “आबा ऐकताय ना?” 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2016 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी (गोल्डन लोटस) राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता . त्याचा दुसरा लघुपट “खरवस” IFFI 2018 मध्ये इंडियन पॅनोरमा (NF) साठी ओपनिंग फिल्म म्हणून निवडला गेला होता आणि सर्वोत्कृष्ट लघुपटाचा 2रा राष्ट्रीय पुरस्कार 2019 मध्ये त्यांच्या लघुपटाने जिंकला होता .

आदित्य जांभळे हे गेल्या 10 वर्षांपासून मराठी नाट्यक्षेत्रात सक्रियपणे सहभागी आहे आणि त्याच्या नटसम्राट , फायनल व्हर्डिक्ट इत्यादी नाटकांसाठी अनेक राज्य पुरस्कार जिंकले आहेत. भारतातील सर्वात तरुण लेखक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. त्यांचा मेगा ड्रामा “वंदे मातरम”. नावाचा राष्ट्रीय एकात्मतेवरील त्यांचा अलीकडील चित्रपट “अमृतसर जंक्शन” 1947 च्या भारताच्या फाळणीला आकार देणाऱ्या संघर्षांचा शोध घेतो.

Article 370 Movie हा चित्रपट चे प्रोड्युसर आहेत आदित्य धर ज्यांनी या अगोदर उरी थे सर्जिकल स्ट्राईक नावाची फिल्म डायरेक्ट केली होती आणि त्या साठी त्यांनी नॅशनल अवॉर्ड पण मिळाले होते, तसेच Article 370 Movie ची स्क्रिप्ट स्टोरी स्क्रीनप्ले आणि संवाद पण आदित्य धार ह्यांनीच लिहिली आहे त्यामुळे ह्या फिल्म मध्ये एक सशक्त पटकथा सोबतच एक चांगला दिग्दर्शन पण आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Article 370 Movie कधी होणार रिलीज ?

नुकताच Article 370 Movie चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि लवकरच हा चित्रपट आपल्याला आपल्याला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात बघायला मिळणार आहे, चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये चित्रपटाची रिलीज डेट २३ फेब्रुवारी २०२४ दाखवण्यात आली आहे.

तुम्हाला हा लेख कसा वाटलं तुम्ही आम्हाला कंमेंट करून सांगू शकता . अजून असेच नव नवीन लेख वाचण्या साठी इथे क्लीक करा!!

मित्रांसोबत शेअर करा !!

Leave a Comment

Exit mobile version