Anandacha Shidha : गणेशोत्सव निमित्त नागरिकांना पुन्हा मिळणार आनंदाचा शिधा या दिवशीपासून होणार वाटप! प्रत्येक भारतीय उत्सवासाठी महाराष्ट्र सरकारकडून आनंदाचा शिधा वाटप केला जातो यावेळेस हा आनंदाचा शिधा गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र सरकारकडून वाटप करण्यात येणार आहे. मागील दोन महिन्यापासून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आनंदाचा शिधाचा वाटप बंद होता परंतु लवकरच आता गणेश उत्सवानिमित्त आनंदाच्या शिधाचा वाटप होणार आहे या उपक्रमासाठी महाराष्ट्र सरकारने जवळपास 562 कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि याबद्दलचा आदेश राज्यातील अन्य व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने काढला आहे.
काय आहे आनंदाचा शिधा योजना आणि कोणाला मिळणार लाभ ?
Anandacha Shidha : गणेशोत्सव निमित्त नागरिकांना पुन्हा मिळणार आनंदाचा शिधा या दिवशीपासून होणार वाटप! आनंदाचा शिधा ही योजना महायुती सरकार तर्फे 2022 पासून लागू करण्यात आलेली आहे यामध्ये दारिद्रय रेषेखालील तसेच केसरी रेशन कार्ड धारकांना सणासुदीच्या मुहूर्तावर राज्य सरकारकडून सवलतीच्या दरात एक किलो चणाडाळ एक किलो साखर एक लिटर सोयाबीन तेल तसेच एक किलो रवा ह्या गोष्टी आनंदाचा शिधा स्वरूपात दिल्या जातात, जेणेकरून गोरगरीब जनतेचा सण हा आनंदात जावो त्यासाठी वरील सर्व वस्तू रेशन दुकान द्वारे फक्त शंभर रुपयांमध्ये दिल्या जातात.
ही योजना महाराष्ट्र सरकार तर्फे गोरगरीब जनतेसाठी लागू करण्यात आलेली आहे यामध्ये पिवळे रेशन कार्ड तसेच तसेच अल्प उत्पन्न असणारे केसरी रेशन कार्ड धारकांसाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये फक्त शंभर रुपयांमध्ये लाभार्थ्यांना एक किलो चणाडाळ एक किलो साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल असा आनंदाचा शिरा दिला जातो.
आनंदाचा शिधा योजनेची पार्श्वभूमी !
Anandacha Shidha : गणेशोत्सव निमित्त नागरिकांना पुन्हा मिळणार आनंदाचा शिधा या दिवशीपासून होणार वाटप! केसरी आणि पिवळा रेशन कार्डधारकांना शंभर रुपयांच्या सवलतीच्या दरात चार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याची ही योजना 2022 मध्ये दिवाळीमध्ये सर्वप्रथम सुरू करण्यात आली. यामध्ये यामध्ये महाराष्ट्रातील 1.70 कोटी कुटुंबांना सवलतीच्या दरात चार खाद्य पदार्थ उपलब्ध करून दिले जातात यामध्ये चणाडाळ साखर सोयाबीन आणि रवा अशा पदार्थांचा समावेश होतो
2023 मध्ये गुढीपाडवा ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दिवाळीसाठी अशाच स्वरूपाची घोषणा करण्यात आली होती आणि त्यामध्ये गोरगरीब जनतेला शंभर रुपयांमध्ये वरील वस्तू रेशन दुकानद्वारे देण्यात आल्या होत्या. तसेच 2024 मध्ये पण अयोध्येतील श्री राम मंदिराच्या अभिषेक समारंभ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आनंदाच्या शिधा चे वाटप करण्यात आले होते.
काय आहे आनंदाचा शिधा या योजनेचा एकूण खर्च ?
Anandacha Shidha : गणेशोत्सव निमित्त नागरिकांना पुन्हा मिळणार आनंदाचा शिधा या दिवशीपासून होणार वाटप! महाराष्ट्र सरकार द्वारे चालवण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा या महत्वकांशी योजनेसाठी एकूण खर्च हा अंदाजे 543.21 कोटी रुपये आणि त्यासाठीचा इतर खर्च एकूण 19.3 कोटी रुपये असा एकूण 562.51 कोटी रुपये इतका प्रस्तावित खर्चाला मान्यता मिळाली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील एकूण 1 कोटी 70 लाख 82 हजार व्यक्तींना याचा लाभ मिळणार आहे .
कधी मिळणार आनंदाचा शिधा ?
Anandacha Shidha : गणेशोत्सव निमित्त नागरिकांना पुन्हा मिळणार आनंदाचा शिधा या दिवशीपासून होणार वाटप! आनंदाचा शिधा गणेशोत्सव सणानिमित्त नागरिकांना 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत ई पास प्रणाली द्वारे मिळणार असून त्यासाठी केवळ शंभर रुपये नागरिकांना द्यावे लागणार आहे, आणि हा आनंदाचा शिधा आपापल्या रेशन कार्ड दुकानात उपलब्ध होणार आहे अधिक माहितीसाठी नागरिकांनी आपल्या रेशन कार्ड दुकानांमध्ये संपर्क साधावा.
Table of Contents
आनंदाचा शिधा योजनेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी इथे क्लिक करा !!
तसेच आमचे इतर लेख वाचण्यासाठी Dot Marathi इथे क्लिक करा !!