Most Powerful Mobile : Realme GT 5 240 W हा आहे जगातला सर्वात पॉवरफुल मोबाइल!! जाणून घ्या काय आहे स्पेसिफिकेशन !

Most-powerful-mobile
Most-powerful-mobile
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मोबाईल हे दिवसेंदिवस खूप जास्त फास्ट आणि पॉवरफुल होत चालले आहे आणि दर महिन्याला वेलवेगळ्या कंपनीचे मोबाईल लाँच होत असतात. आणि ह्या मोबाईल कंपन्या ह्या रेस मध्ये टिकून राहण्यासाठी काही ना काही नवीन नेहमी घेऊन येत असतात, अश्यातच रिअलमी Realme पण ह्याच्या मध्ये मागे नाहीये आणि Realme ने बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी जगातला सर्वात पॉवरफुल मोबाईल Most Powerful Mobile बाजारात आणला आहे.

कोणता आहे हा मोबाईल ?

Realme-GT-5-240-W
Realme-GT-5-240-W

Realme नेहमीच आपल्या ग्राहकांना काही तरी नवीन देण्याचा प्रयत्नात असते आणि ह्या वेळेस त्यांनी आपल्या ग्राहकांसाठी जगातील सर्वात पॉवरफूल मोबाईल Most Powerful Mobile आणला आहे. ह्या मोबाईल चे नाव आहे Realme GT 5 240 W . आणि हा मोबाईल स्पेसिफिकेशन्स च्या बाबतीत आत्ताच्या सर्व मोबाईल चा बाप आहे. ह्या मध्ये देण्यात आलेले फीचर्स आतापर्यंत कोणत्याच मोबाईल मध्ये कोणत्याच कंपनी कडून देण्यात आलेले नाहीये.

Realme GT 5 240 W Specification काय आहेत स्पेसिफिकेशन्स ?

Realme-GT-5-240-W-specification
Realme-GT-5-240-W-specification

Realme GT 5 240 W Specification : हा आतापर्यंत मोबाईल मध्ये Beast आहे, ज्यामध्ये सर्व काही खूप जास्त आणि ठासून भरलेलं आहे.

सर्वात पहिले आपण ह्यामध्ये असलेलं प्रोसेसर बद्दल जाणून घेऊ या.

पॉवरफुल प्रोसेसर

ह्या Realme GT 5 240 W मध्ये नवीन bleeding-edge Snapdragon 8 Gen 2 हे प्रोसेसर आहे जे आतापर्यंत चे सर्वात फास्ट प्रोसेसर आहे आणि ह्यावर तुम्ही किती हि मल्टी टास्किंग करू शकता. तसेच ह्या मध्ये तुम्हाला 36 GB ची रॅम मिळणार आहे!! हो तुम्ही बरोबर वाचलं 36 GB ची रॅम!! विचार करा ह्या 36 GB RAM आणि Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर सोबत मिळणार हा मोबाईल किती पॉवरफुल असणार आहे. 36 GB रॅम मध्ये तुम्हाला 24 GB + 12 GB वर्चुअल रॅम मिळणार आहे, आणि ह्या मोबाईल चा Antutu Score 1.6 Million पेक्षा जास्त आहे.

फास्टेस्ट चार्जर

ह्या सोबतच ह्या Realme GT 5 मध्ये तुम्हाला 240 W चे फास्ट चार्जेर मिळणार आहे. 240 च्या चार्जेर सोबत हा जगातील सर्वात फास्ट चार्जिंग करणारा मोबाईल असणार आहे. ज्या मध्ये तुम्ही तुमचा मोबाईल 0 पासून 100 % पर्यंत फक्त 7 ते 9 मिनिटात तुम्ही चार्ज करू शकणार आहे. ह्या मध्ये तुम्हाला 4600 mAh ची बॅटरी मिळणार आहे. आणि जर तुम्ही फक्त 30 सेकंड हा मोबाईल चार्ज केला तर तुम्ही 2 तासापर्यंत ह्या मोबाईल वर बोलू शकता.

कॅमेरा

Realme GT 5 मध्ये तुम्हाला मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप बघायला मिळणार आहे. यामध्ये मेन कॅमेरा 50 मेगा पिक्सल चा जबरदस्त कॅमेरा मिळणार आहे ज्या सोबतच 8 मेगा पिक्सल चा अल्ट्रा वाईड आणि 2 मेगा पिक्सल चा मॅक्रो कॅमेरा असणार आहे. 50 मेगा पिक्सल च्या मेन कॅमेरा मंध्ये तुम्ही 4K, 60 Fps पर्यंत विडिओ शूट करू शकता सोबतच सेल्फी कॅमेरा हा 16 मेगा पिक्सल चा आहे जो सेल्फी साठी परफेक्ट कॅमेरा आहे. आणि मागच्या आणि सेल्फी दोन्ही कॅमेरा मध्ये इमेज स्टॅबिलायझेशन (EIS) असणार आहे.

Realme GT 5 240 W Launch : कधी येणार भारतीय बाजारात?

Realme GT 5 240 W Launch : मित्रांनो रिअल मी चा हा मोबाईल खूप स्पेसिफिकेशन्स सोबत लोडेड आहे पण हा मोबाईल तुम्हाला सध्या तरी भारतीय बाजारात बघायला मिळणार नाहीये कारण सध्या हा मोबाईल फक्त चीन मध्ये लाँच झाला आहे आणि तिथे हा मोबाईल चालला तर लवकरच तुम्हाला भारतीय बाजारात हा मोबाईल तुम्हाला Realme GT 5 प्रो नावाने बघायला मिळू शकतो.

ह्या मोबाईल बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

आमचे इतर लेख वाचण्यासाठी तुम्ही Dot Marathi इथे क्लिक करू शकता.

मित्रांसोबत शेअर करा !!

Leave a Comment